14 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

0
39


14 October 2019 Current Affairs In Marathi

चालू घडामोडी (14 ऑक्टोबर 2019)

भारतीय नन मरियम थ्रेसिआ यांना संतपद जाहीर :

 • व्हॅटिकन सिटीमध्ये झालेल्या एका भव्य कार्यक्रमात भारतीय जोगीण (नन) मरियम त्रेस्या यांच्यासह आणखी चौघांना पोप फ्रान्सिस यांनी संत घोषित केले.
 • केरळमधील त्रिशुर येथे मे 1994 मध्ये ‘काँग्रिगेशन ऑफ दि सिस्टर्स ऑफ दि होली फॅमिली’ची स्थापना केलेल्या मरियम त्रेस्या यांना सेंट पीटर्स चौकात झालेल्या कार्यक्रमात ख्रिस्ती धर्मातील हे सर्वोच्च पद बहाल करण्यात आले
 • तसेच केरळमधील या जोगिणीशिवाय ब्रिटनचे कार्डिनल जॉन हेन्री न्यूमन, स्वित्झर्लंडच्या मार्गेरिट बेज या सामान्य महिला, ब्राझीलच्या सिस्टर डुल्स लोपेस आणि इटलीच्या सिस्टर गिसेप्पिना वन्निनी यांनाही संतपद देण्यात आले.
 • तर या कार्यक्रमात लॅटिन भाषेतील एक ईशस्तोत्र म्हणण्यात आले. ‘आमच्या या संतांसाठी आज आम्ही ईश्वराचे आभार मानतो’, असे पोप फ्रान्सिस उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमादरम्यान, या पाच नव्या संतांची प्रचंड मोठी तैलचित्रे सेंटर पीटर्स बॅसिलिका येथे लावली होती.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी क्रिकेटचा ‘दादा’ :

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
 • बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या तुलनेत गांगुलीचे पारडे जड मानले जात आहे.
 • गांगुलीला पटेल यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळत असल्याची माहिती मिळत आहे.
 • सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर तो या पदावर 2020 पर्यंत कार्यरत राहील. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे नवे सचिव, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होण्याची शक्यता आहे.
 • तसेच बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धात मंजूला रौप्यपदक :

 • भारताची युवा बॉक्सर मंजू राणी हिची विजयी घोडदौड अखेर रशियाच्या एकतारिना पाल्टसेव्हा हिने रोखली. लाइट फ्लायवेट (48 किलो) गटाच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्याने मंजू राणी हिला रौप्यपदकावर समाधान मानावे
  लागले. जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली.
 • जागतिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या हरयाणाच्या सहाव्या मानांकित मंजू राणीला दुसऱ्या मानांकित एकतारिनाकडून 1-4 अशा पराभवाला सामोरे जावे लागले.
 • तर एम. सी. मेरी कोम (51 किलो), जमुना बोरो (54 किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन (69 किलो) यांना उपांत्य फेरीतच पराभूत व्हावे लागल्यानंतर मंजू राणीने अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली होती.
 • तसेच 4 जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारताने चार पदकांची कमाई केली. मंजू राणीने भारताला रौप्य तर एम. सी. मेरी कोम, जमुना बोरो आणि लव्हलिना बोर्गोहेन यांनी कांस्यपदक मिळवून दिले.

ऐतिहासिक कसोटीत विराटचा ‘Super 30’ क्लबमध्ये समावेश :

 • भारतीय संघाने पुण्याच्या गहुंजे मैदानावर दक्षिण आफ्रिकेवर 1 डाव आणि 137 धावांनी मात करत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग 11 वा मालिका विजय ठरला आहे. याआधी कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाहीये. कर्णधार विराट कोहलीसाठीही हा सामना अतिशय महत्वाचा ठरला आहे.
 • कर्णधार या नात्याने विराट कोहलीसाचा हा 50 वा सामना होता. याच सामन्यात विराटने पहिल्या डावात नाबाद द्विशतकी खेळी करताना 254 धावा केल्या. याचसोबत विजयानंतर विराटचा Super 30 क्लबमध्ये समावेश झाला आहे.
 • तसेच कर्णधार या नात्याने पहिल्या 50 कसोटी सामन्यात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्यांच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानी आहे. विराटचा कर्णधार म्हणून हा 30 वा विजय ठरला आहे.

दिनविशेष :

 • 14 ऑक्टोबरजागतिक मानक दिन
 • भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ 14 ऑक्टोबर 1882 मध्ये सुरु झाले.
 • ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास 14 ऑक्टोबर 1920 मध्ये स्त्रियांना प्रवेश दिला.
 • 14 ऑक्टोबर 1924 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here