16 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

0
33


16 October 2019 Current Affairs In Marathi

चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2019)

राम मंदिर प्रकरणी आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता :

 • अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याबाबत मंगळवारी संकेत दिले.
 • तर मंगळवारी अयोध्या प्रकरणी सुनावणीचा 39 वा दिवस होता. तसंच सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद बुधवारी पूर्ण करण्याचे आदेशही काल झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये कलम
  144 लागू करण्यात आले आहे.
 • तसेच आज सर्व पक्षकार आपला युक्तीवाद पूर्ण करतील अशी आशा असल्याची माहिती हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी दिली. त्यानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा करण्यात येईल. तसंच बुधवारीच यावर चर्चा पूर्ण झाल्यास
  निकाल सुरक्षित ठेवला जाईल. परंतु या सर्व बाबी न्यायालयावर अवलंबून असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 • दरम्यान, दोन्ही पक्षकारांना आज साडेतीन तासांची वेळ देण्यात येईल. तसंच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानतर सुनावणी पूर्ण होईल. दोन्ही पक्षकारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी प्रत्येकी एक एक तास देण्यात येणार असून युक्तीवादासाठी
  दोन्ही पक्षांना प्रत्येकी 45 मिनिटे देण्यात येणार आहेत.

मार्गारेट अ‍ॅटवूड, बर्नार्डिन एव्हरिस्टो यांना बुकर पुरस्कार :

 • इंग्रजी साहित्यविश्वात मानाच्या ओळखल्या जाणाऱ्या बुकर पुरस्काराच्या निवडीसाठी यंदा सर्वाधिक चुरस झाली.
 • परीक्षक मंडळाने अंतिम निकालाच्या दिवशी पाच तासांहून अधिक काळ चर्चा करीत नियमांना बगल देऊन अखेर कॅनेडियन लेखिका मार्गारेट अ‍ॅटवूड आणि आफ्रो-ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन एव्हरिस्टो यांच्या पुस्तकांना संयुक्तपणे पुरस्कार जाहीर केला.
 • तर 1992 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली असताना पुरस्काराचे नियम बदलून दोन जणांना एकाचवेळी पुरस्कार द्यायचा नाही असे ठरले होते, पण यावेळी पाच तासांच्या चर्चेनंतर परीक्षक समितीचे प्रमुख पीटर फ्लॉरेन्स यांनी आम्ही हा नियम बदलत आहोत असे जाहीर करून दोघींना पुरस्कार जाहीर केला.
 • अ‍ॅटवूड यांना ‘द ब्लाइंड अ‍ॅससिन’ या पुस्तकासाठी यापूर्वी बुकर पुरस्कार मिळाला होता. नंतर ‘द हँडमेड्स टेल’ या पुस्तकाला नामांकनही मिळाले होते.

मतदानाच्या दिवशी ‘एक्झिट पोल’वर बंदी :

 • भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.
 • 21 ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह 17 राज्यांमधील 51 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे. यादिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मतदानोत्तर चाचण्यांचे कल दाखवण्यास (एक्झिट पोल) बंदी घालण्यात आली आहे.

दिनविशेष

 • 16 ऑक्टोबर 1868 मध्ये डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.
 • भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश 16 ऑक्टोबर 1905 मध्ये दिला.
 • 16 ऑक्टोबर 1978 मध्ये माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
 • 16 ऑक्टोबर 2003 मध्ये नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here