20 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

  0
  167


  20 September 2019 Current Affairs In Marathi

  चालू घडामोडी (20 सप्टेंबर 2019)

  ISRO ने चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या ऑर्बिटरबद्दल दिली माहिती :

  • चांद्रयान-2 मोहिमेत पाठिशी उभे राहिल्याबद्दल देशवासियांचे आभार मानल्यानंतर इस्रोने आज ऑर्बिटरच्या प्रकृतीची माहिती दिली. ऑर्बिटरच्या पेलोडवर करण्यात आलेले प्रारंभिक प्रयोग यशस्वी ठरले आहेत. सर्व पेलोडसची कामगिरी
   समाधानकारक आहे असे इस्रोने म्हटले आहे.
  • चांद्रयान-2 चा ऑर्बिटर ठरल्याप्रमाणे सर्व वैज्ञानिक चाचण्या करत आहे. ऑर्बिटरमध्ये आठ अत्याधुनिक पेलोड आहेत. ज्यावरुन चंद्राचा नकाशा तयार करण्यात येईल तसेच चंद्रावर पाणी, बर्फ, खनिजांचा शोध घेतला जाईल. वि
   चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल असा विश्वास काही दिवसांपूर्वी इस्रोचे प्रमुख सिवान यांनी व्यक्त केला होता.
  • तसेच आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी सात वर्ष कार्यरत रहाणार आहे. पाण्यासंदर्भात महत्वपूर्ण शोध ऑर्बिटरच्या माध्यमातून लागू शकतो.
  • ऑर्बिटरमुळे चंद्रावर बर्फ आणि पाणी शोधून काढण्याची संधी आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली 10 मीटरपर्यंत गोठलेले पाणी पाहण्याची क्षमता आमच्याकडे आहे.

  इंडियन एअर फोर्सचे पुढचे प्रमुख आरकेएस भदौरिया :

  • एअर मार्शल आरकेएस भदौरिया भारताचे पुढचे हवाई दल प्रमुख असतील. संरक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली.
  • तसेच सध्या ते एअर फोर्सचे व्हाइस चीफ आहेत. त्यांनी फ्रान्सबरोबरच्या राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात महत्वाची भूमिका बजावली होती.
  • तर सध्याचे इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ 30 सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत.
  • आरकेएस भदौरिया 1980 साली फायटर पायलट म्हणून एअर फोर्समध्ये रुजू झाले. भदौरिया यांच्याकडे 4250 तासांपेक्षा जास्तवेळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना फायटर, ट्रान्सपोर्ट विमानांसह २६ वेगवेगळया प्रकारच्या विमान
   उड्डाणाचा अनुभव आहे.

  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची स्वदेशी ‘तेजस’मधून भरारी :

  • हिंदुस्थानी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बंगळुरू येथील हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावरून उड्डाण केले.
  • तर स्वदेशी तेजस लढाऊ विमानात बसणारे ते पहिले संरक्षणमंत्री आहेत. राजनाथ सिंह यांनी अर्धा तास विमानात घालवला.
  • तसेच हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीने तेजसची निर्मिती केली आहे.
  • तेजस हे लढाऊ विमान असून, तीन वर्षापूर्वीच ते हवाई दलात दाखल झाले आहे.
  • तेजस लवकरच अद्ययावत स्वरूपात येणार आहे. 83 तेजस विमानांची निर्मिती हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड करणार असून त्यासाठी 45 हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे.

  दिनविशेष :

  • सन 1857 मध्ये (1857चा राष्ट्रीय उठाव) ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.
  • भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म 20 सप्टेंबर 1911 मध्ये झाला.
  • चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म 20 सप्टेंबर 1922 मध्ये झाला.
  • 20 सप्टेंबर 1933 हा दिवस विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अॅनी बेझंट यांचा स्मृतीदिन आहे.

  चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here