3 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

0
80


3 October 2019 Current Affairs In Marathi

चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2019)

राजस्थानातील तीन रेल्वे स्थानके स्वच्छतेबाबत देशात सर्वोत्कृष्ट :

 • रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केलेल्या रेल्वेच्या स्वच्छता सर्वेक्षणात राजस्थानमधील तीन रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान मिळवला.
 • तर उपनगरीय स्थानकांमध्ये हा मान मिळवणाऱ्यांत मुंबईतील 3 स्थानके आहेत.
 • रेल्वेच्या देशभरातील 720 स्थानकांपैकी जयपूर, जोधपूर व दुर्गापुरा या तीन स्थानकांनी यादीत पहिल्या तीन क्रमांकांवरील स्थान पटकावले.
 • तसेच 109 उपनगरीय स्थानकांपैकी मुंबईतील अंधेरी, विरार व नायगाव ही तीन स्थानके पहिल्या तीन क्रमांकांची ठरली.
 • तर रेल्वेचा विभागनिहाय विचार करता, उत्तर पश्चिम रेल्वेने पहिला क्रमांक मिळवला. त्याखालोखाल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वे यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक आहे.

‘असा’ विक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू :

 • विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याला पावसाचा फटका बसला.
 • तर चहापानाच्या सत्रापर्यंत भारतीय फलंदाजांनी सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. सलामीवीर रोहित शर्माचं नाबाद शतक(115) आणि मयांक अग्रवालने (84) त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेरीस बिनबाद 202 धावांपर्यंत मजल मारली.
 • रोहित शर्माने सलामीवीर म्हणूनच पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याचसोबत ICC च्या स्पर्धांमध्ये त्याने एक विशेष विक्रम केला.
 • ICC च्या तीन मोठ्या स्पर्धांमध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरला.
 • रोहितने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ICC एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शतक लगावले होते. त्यानंतर रोहितने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळण्यात आलेल्या आजच्या कसोटी सामन्यात शतक लगावले.

दिनविशेष:

 • हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 मध्ये झाला.
 • इराकला सन 1932 मध्ये युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
 • जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने सन 1935 या वर्षी इथिओपिया पादाक्रांत केले.
 • सन 1952 मध्ये युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here